Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

सोनियाची मराठी 2 by Anand

SongGPT
सोनियाची मराठी 2 by Anand - Marathi Powada,both vocals music cover art

सोनियाची मराठी 2

Marathi Powada,both vocals

0:003:47
Lyrics
Description
[ verse 1]
महाराष्ट्राच्या मातीची,खळखळणाऱ्या झऱ्यांची,
संतांच्या अभंगांची,शेतकऱ्याच्या घामाची…
सह्याद्रीच्या काठावरली,अमुच्या घराघरातली…
सोनियाची मराठी.. सोनियाची मराठी.. सोनियाची मराठी..
[Verse 2]
किल्ल्यांवरची माती,धडधडत्या छाती,
महापुरुषांच्या आंदोलनांची,महाराष्ट्र मुक्तीच्या लढ्याची …
रांगोळ्यांच्या रंगांत ,महाराष्ट्राच्या शेताशेतातील सोनेरी पिकांची..
[Chorus]
सोनियाची मराठी जशी सोनेरी कहाणी
पाऊस झेलणारी …कणखर ती वाणी
आईच्या अंगाईची..प्रियसीच्या पैजन वाजण्याची..
शाहिरांच्या ललकारी.. सोनियाची मराठी
[Bridge]
चंद्रभागेच्या काठी संतांची पालखी
हळदीकुंकू जिथे फुलते नव्या नवरीची कुंकुवाची..
कष्टकरांच्या घामाच्या धारांची..तरुणाईच्या रक्तात सळसळणारी..सोनियाची मराठी…
[Chorus]
तलवारींच्या पात्याची,लेखणीतून फुलणाऱ्या शाहीची..विद्रोहाची..हक्कासाठी लढणाऱ्यांची..सोनियाची मराठी…सोनियाची मराठी…सोनियाची मराठी…सोनियाची मराठी…