Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

निराकारा साकार 2 by Shashikant

SongGPT
निराकारा साकार 2 by Shashikant - Marathi,both vocals music cover art

निराकारा साकार 2

Marathi,both vocals

0:003:37
Lyrics
Description
निराकारा साकार होऊन ये ना. ॥ धृ ॥
तुझा हा विरह सहन होईना.
सौसार, गृहस्थि मला ना जमेना.
धनाचा हव्यास मनाला रुचेना.
निराकारा साकार होऊन ये ना. ॥१ ॥
तयांची संगती मनाला रुळेना.
याविना उदर निर्वाह होईना.
तहान, भुकेन अति राहवेना
काम, क्रोधाचा आवेग सहवेना.
निराकारा साकार होऊन ये ना. ॥ २ ॥
रोग, व्याधि कदिहि संपेना.
देहाची गरज भागता भागेना.
आनंद अनुभव कदिहि होईना.
कर्तव्य माझे मजला कळेना.
निराकारा साकार होऊन ये ना. ॥ ३ ॥
मनाला शांती किंचीत मिळेना.
मोह, माया काहि सुटेना.
अनंतामध्ये तु मला हि तु घे ना.
हृदयात बसुन तु पाहू नको ना.
निराकारा साकार होऊन ये ना. ॥ ४ ॥
प्रारब्ध कर्म मजला कळेना.
आरब्ध कर्म टळता टळेना.
म्हणून होतात जिवास वेदना.
सर्व संचित माझे तु जाळून ये ना.
निराकारा साकार होऊन ये ना. ॥ ५ ॥