Create New Playlist

Add a cover pic of your own choice

(Optional)

Name

AI Cover Generator

4 credits

Not enough credits (0/4).

Logout

Are you sure you want to Logout?

Close

धरतीची गाथा 1 by Subhash

SongGPT
धरतीची गाथा 1 by Subhash - Folk,female vocals music cover art

धरतीची गाथा 1

Folk,female vocals

0:003:52
Lyrics
Description
धरतीने जोडले असे घनसरींशी नाते
वाऱ्यालाही हरित करे गवताचे लवलवते पाते
झाडं आक्रसून गेली पाहून पानांची हुडहुडी
जित्राबं बिलगली एकमेकां थंड होता कुडी
चाकोरीचा ओघळ गेला पार क्षितिजापाशी
शेतं निजली घट्ट खेटून, करून डोंगराची उशी
गर्द धुक्याच्या पडद्याआड धरती सलज्ज उभी
इंद्रधनुच्या हारासंगे सज्ज वरूणदेव नभी
चंद्रमौळी कौलारं झिरपे, जीवाची होई थरथर
तव्यावरची भाकरी ओली थेंब करती चर्र चर्र
शेकोटी ती पेट घेईना पावसाला ना कणव येई
जुन्या नव्या खोडांना पोटाची भूक अनावर होई
पर्वत कडा अचल खडा वंदन स्विकारी तराईचा
नादस्वर तो अद्भुत घुमतो विस्तारलेल्या देवराईचा
// कोरस //
धरतीची गाथा सांगते, जीवनाचा रंग पांघरते
निसर्गाच्या कुशीत आपुलकीने बांधते
सावल्या आणि सूर्याच्या खेळात, जीव रंगतो प्रीतीत
गवताच्या लवलवत्या पानांत, नवे स्वप्न उगवती
// ब्रिज //
वारा घेऊन येतो गोडवा, आकाशात रंगांची सोहळा
पावसाच्या थेंबांतून झरतो संगीताचा झरा
आणि आम्ही नाचतो त्या निसर्गाच्या तालावर
जीवनाच्या गाण्यात गुंफलेली खरी माणूसपणाची साखर
// कोरस (परत) //
धरतीची गाथा सांगते, जीवनाचा रंग पांघरते
निसर्गाच्या कुशीत आपुलकीने बांधते
सावल्या आणि सूर्याच्या खेळात, जीव रंगतो प्रीतीत
गवताच्या लवलवत्या पानांत, नवे स्वप्न उगवती
(अंत्याशी शांत आणि उर्जावान नोटा, निसर्गाच्या सौंदर्याचा सन्मान करत